काही वेळा एखादे संत पूजा, पठण इत्यादी करायला सांगतात. त्यांनी सांगितलेली साधना एखादा आधीपासूनच करत असला, तर त्याला वाटते, मी हे करतच आहे. त्याने लाभ झाला नाही, तर आता तेच करून लाभ कसा होईल ? त्याने हे लक्षात घेतले पाहिजे की, त्या कृतींपेक्षा त्या करण्यास सांगणार्या संतांचा संकल्प कृती करतांना कार्यरत होतो. त्यामुळे फलप्राप्ती होते. – (प.पू.) डॉ. आठवले