मायेपासून दूर जाणे एक वेळ सुलभ आहे; पणमायेतील ब्रह्माची अनुभूती घेणे संतांनाही अती कठीणअसल्याने भगवंताला अवतार घ्यावा लागतो !

साधना करून कुंडलिनीला मूलाधारचक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत नेणे, म्हणजेच सगुणातून निर्गुणाकडे जाणे एक वेळ सुलभ आहे; पण सगुणातील राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी ब्रह्मरंध्रापासून परत मूलाधारचक्रापर्यंत येणे बहुतेक संतांनाही अती कठीण जाते. ज्या सगुणाला सोडून निर्गुणाकडे जाण्यासाठी त्यांनी साधना केली, त्या सगुणाकडे पुन्हा जाण्यास ते तयार नसतात आणि म्हणूनच भगवंताला अवतार घ्यावा लागतो. हे व्यष्टी साधना करणार्‍या संतांच्या संदर्भात लागू पडते; मात्र समष्टी साधना करणारे संत राष्ट्र आणि धर्म यांचे सगुणातील कार्य सहजतेने करतात. – (प.पू.) डॉ. आठवले

Leave a Comment