१. मुलगा जन्माला आल्यापासून नोकरी लागेपर्यंत जवळ रहातो; पण नंतर नोकरीच्या गावी जातो.
२. मुलगी जन्माला आल्यावर लग्न होईपर्यंत जवळ रहाते; पण नंतर सासरी जाते.
३. नोकरी करतांना सहकार्यांबरोबर काही वर्षे असतात; पण नंतर सेवानिवृत्त झाल्यावर कोणाशीच भेट होत नाही.
४. पती-पत्नी काही वर्षे एकत्र; पण नंतर एक आधी मृत्यू पावतो.
तात्पर्य, जीवन म्हणजे थोड्या काळासाठी एकत्र येणे आणि नंतर कायमचे दूर जाणे ! एवढेच नव्हे, तर जीवनात दुःखाचेही अनेक प्रसंग घडतात. असे जन्मानुजन्म चालू असते. यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे साधना !
– (प.पू.) डॉ. आठवले