काही जणांना वाटते, वाईट शक्तींचा त्रास नसला, तर नामजप करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, स्वभावदोष रज-तम गुणांमुळे निर्माण होतात. नामजपामुळे सत्त्वगुण वाढतो. तो वाढला की, रज-तम गुण अल्प होऊ लागतात, म्हणजेच साधनेत प्रगती होऊ लागते. याचा अर्थ हा की, वाईट शक्तींचा त्रास दूर करणे आणि सत्त्वगुण वाढवणे, या दोन्हींसाठी नामजप उपयोगी आहे. – (प.पू) डॉ. आठवले