साधना करू इच्छिणारे; पण बुद्धीचा वापर करणारे काही वेळा साधनेच्या संदर्भात का ? कसे ?, असे प्रश्न विचारतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, का ? कसे ?, असे प्रश्न न विचारणारे साधनेत त्यांच्या पुढे जातात. पुढे त्यांचा बुद्धीलय झाल्यावर त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे आतूनच समजतात. यावरून हे लक्षात येते की, कार्यकारणभाव ज्ञात नसला, तरी सांगितल्याप्रमाणे साधना करणे आवश्यक. त्यामुळे स्वेच्छेमुळे निर्माण झालेल्या का ? कसे ? यांचा, म्हणजेच स्वेच्छेचा लय होण्यास साहाय्य होते आणि परेच्छेने वागल्याने, म्हणजे सांगितल्याप्रमाणे साधना केल्यामुळे त्यांची प्रगती होते. – (प. पू.) डॉ. आठवले