मनाचा शरिरावर आणि शरिराचा मनावर परिणाम होतो; म्हणूनच मनाच्या काळजीने आम्लपित्त, रक्तदाब इत्यादी शारीरिक विकार होतात आणि शारीरिक विकारामुळे मनाला निराशा येणे इत्यादी विकार होतात. मनाचा शरिरावर परिणाम होत असल्यामुळे परिणाम होणार्या इतर अवयवांप्रमाणे हात आणि पाय यांच्यावरही परिणाम होऊन त्यांवरील रेषांतही पालट होतात. ते पालट केवळ या जन्मातील घटनांच्या संदर्भातील नसून जन्मोजन्मी तेच मन असल्याने मनावर जन्मोजन्मी झालेले संस्कार हेही हात आणि पाय यांच्यावरील रेषांवरून दिसून येतात. तो विषय हस्तसामुद्रिक आणि पदसामुद्रिक ही शास्त्रे समजावून सांगतात. – (प. पू.) डॉ. आठवले