वेद म्हणतात, तो (भगवंत) बृहद् झाला आहे. भगवंत विविध रूपांतून प्रकट होतो. माझ्या साहाय्यासाठी सर्व वस्तू आणि प्राणी आहेत. पहाण्याची दृष्टी पालटली पाहिजे. भगवंत माझ्यामधून कार्य करतो. माझी स्तुती ही भगवंताची स्तुती आहे; म्हणून त्याची बदनामी होऊ नये, असे वागणे म्हणजे साधना होय. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.८.२०१४)
देवाण-घेवाण
‘आपण दुसर्याला चांगले समजल्यास आपल्याला १० सहस्रपट चांगले मिळते. आपण दुसर्याला कचरा समजल्यास आपल्याला १० सहस्रपट कचरा मिळतो.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.८.२०१४)