व्यवहारात कोणाचे साहाय्य हवे असल्यास त्यांना कार्याविषयी बरीच माहिती सांगावी लागते किंवा कोणाच्या तरी ओळखीने त्यांना भेटलो, तरच ते साहाय्य करण्याचा विचार करतात. याउलट संतांकडे गेल्यावर त्यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती ही नावे सांगितली, तरी साधकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या साधनेमुळे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या ध्येयामुळे ते पुरेसे असते. खरे म्हटले, तर संतांना काहीच सांगावे लागत नाही. त्यांना आपल्या कार्याची जाणीव आतूनच होत असल्याने ते लगेच स्वतःहून साहाय्य करतात. व्यावहारिक जगातील कोणाच्याही साहाय्याच्या ते साहाय्य अनंत पटींनी महत्त्वाचे असते. संतांच्या अशा साहाय्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य वेगाने वाढत आहे. – (प.पू.) डॉ. आठवले