भावार्थ : ‘हे असे आहे का ?’ मधील ‘हे’ मायेविषयी आहे. ‘ते तसे आहे का ?’ मधील ‘ते’ ब्रह्मासंबंधी आहे. ‘हे असेही नाही, तसेही नाही’, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि ‘तशीही नाही’ म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ‘ते कशात नाही ?’ म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ‘ते असेही आहे आणि तसेही आहे’ म्हणजे माया व ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’)