वर्ष २०२३ भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन होईल. त्यानंतर पुढील ५० वर्षांत हिंदु समाजात विविधांगी आमूलाग्र पालट होतील. हे पालट अभ्यासल्यानंतर हिंदु राष्ट्रातच मानवाची खरा विकास किंवा प्रगती होईल, असे आज म्हणता येईल.
१. सामाजिक समस्यांचे निर्मूलन
१ अ. गुंडगिरी, चोर्या, दरोडे, हत्या, बलात्कार आदी गुन्हेगारीचे प्रमाण टप्प्याटप्प्याने न्यून होत जाईल.
१ आ. उपासमारी, कुपोषण आदींचे प्रमाण टप्प्याटप्प्याने न्यून होत जाईल.
२. प्रशासकीय कार्यक्षमतेचे वर्धन
२ अ. प्रशासन कार्यक्षम झाल्याने शासकीय कार्यालयांतील कामे तत्परतेने होतांना दिसतील.
२ आ. नगरे (शहरे), गावे, नद्या आणि जलाशय स्वच्छ दिसतील.
२ इ. गावागावांत खड्डेविरहित रस्ते दिसतील.
२ ई. सर्वत्र वीज उपलब्ध झाल्याने प्रत्येक घर रात्री प्रकाशमान दिसेल.
३. आर्थिक सुधारणा
३ अ. देश टप्प्याटप्प्याने स्वावलंबी होत गेल्याने परदेशी उत्पादनांची आयात न्यून होईल.
३ आ. देशाची अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने सबळ होऊन भारतीय चलन अमेरिकी डॉलरच्या मूल्याएवढे वधारेल.
४. पर्यावरणाचे रक्षण
४ अ. कचरा, ध्वनी, जल, वायू आदी प्रदूषणाचे प्रमाण टप्प्याटप्प्याने न्यून होत जाईल.
४ आ. गोहत्या रोखल्या गेल्यामुळे मूकपणे आसवें गाळणार्या गायी आनंदाने हंबरतील.
४ इ. किरणोर्त्सगामुळे लोप होत चाललेला पशू-पक्ष्यांचा किलबिलाट पुनश्च ऐकू येईल.
४ ई. निसर्ग टप्प्याटप्प्याने अनुकूल होत गेल्याने भूमी सुजलाम आणि सुफलाम् झालेली दिसेल.
५. हिंदु संस्कृतीचे संवर्धन
५ अ. देवभाषा संस्कृतचे पुनरुज्जीवन झाल्याने संस्कृतमध्ये संभाषण होतांना दिसेल.
५ आ. घरोघरी भिंतींवर कॅलेंडर नाही, तर हिंदु पंचांग दिसू लागतील.
५ इ. उषःकाली कर्णकर्कश मशिदींवरील अजान नव्हे, तर वेदमंत्रांचे उच्चार, भक्तीगीते आदी ऐकू येतील.
५ ई. सार्वजनिक उत्सव आणि सण अनुचित प्रकारांविरहित आणि भक्तीभावाने साजरे होतांना दिसतील.
६. मानवी जीवनाचा विकास
६ अ. सर्व नागरिक टप्प्याटप्प्याने धर्माचरणी बनून नंतर साधकवृत्तीचे बनतील.
६ आ. घरोघरी आयुर्वेदाचा प्रसार झाल्याने निरोगी जीवन जगता येईल.
– (प.पू) डॉ. आठवले