हिंदु राष्ट्रासाठीच नव्हे, तर कोणत्याही उपक्रमासाठी प्रयत्न करण्याचा स्तर आणि यश मिळण्याचे, तसेच यश मिळण्यास आरंभ होण्याचे आणि ते टिकण्याचे तुलनात्मक प्रमाण
प्रयत्न करण्याचा स्तर | यश मिळण्याचे तुलनात्मक प्रमाण (टक्के) | यश मिळण्यास आरंभ होण्याचा तुलनात्मक कालावधी | यश टिकण्याचे तुलनात्मक प्रमाण (टक्के) |
---|---|---|---|
१. शारीरिक | ३० | अल्प | ५ |
२. मानसिक | ५० | मध्यम | ३० |
३. आध्यात्मिक | १०० | अधिक | १०० |
तक्त्यावरून लक्षात येईल की, केवळ आध्यात्मिक स्तर कार्याच्या मुळापर्यंत जात असल्याने, म्हणजे काळ अनुकूल आहे कि नाही, काही आध्यात्मिक अडथळे आहेत कि नाही इत्यादी विचार करत असल्याने आणि त्याला भगवंताचा आशीर्वाद असल्यामुळे यश १०० टक्के मिळते आणि यश टिकण्याचा अवधी सर्वांत अधिक असतो. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच्या आणि मानवजातीला सुखी करण्याच्या प्रयत्नात साधनेचे महत्त्व किती आहे, हेही या तक्त्यावरून लक्षात येईल.
– (प.पू) डॉ. आठवले