व्यष्टी किंवा समष्टी साधना करणार्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।, म्हणजे धर्माचरणासाठी, म्हणजेच साधना करण्यासाठी शरीर हे महत्त्वाचे साधन आहे. याचा अर्थ असा की, शरीर सुदृढ असेल, तरच साधना चांगल्या तर्हेने करता येते; म्हणून व्यायाम, प्राणायाम, आसने इत्यादी करणे, तसेच योग्य आहार घेणे आवश्यक आहे.
१. व्यष्टी साधना करणारे
यांच्या दृष्टीने देहबुद्धी नष्ट करणे महत्त्वाचे असल्याने ते व्यायाम, आहार इत्यादी गोष्टींकडे लक्ष देत नाहीत, म्हणजे शरीर सुदृढ रहावे, यासाठी प्रयत्न करत नाहीत. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, भक्त झाल्यावर देव रक्षण करणारच आहे; मात्र तोपर्यंत आजारापासून आणि सध्याच्या काळात आक्रमकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी शरीर सुदृढ असण्यासाठी प्रतिदिन योग्य आहार, तसेच व्यायाम इत्यादी कृती करणे आवश्यक आहे.
२. समष्टी साधना करणारे
यांच्यासाठी तर शरीर सुदृढ असणे आवश्यक असल्याने त्यांनीही योग्य आहार, तसेच व्यायाम इत्यादी कृती प्रतिदिन करणे आवश्यक आहे.
– (प.पू) डॉ. आठवले