साधना करतांना मनोलय होणे, हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. नामजप, प्रार्थना अशा भक्तीमार्गातील साधनांनी, तसेच कर्मयोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग या मार्गांनीही मनोलय होण्यास बराच काळ लागतो. याउलट आज्ञापालन करत गेल्यास मनोलय आणि बुद्धीलय होण्यास साहाय्य होते. यावरून साधकाने उत्तरदायीत्व असलेल्याचे आणि शिष्याने गुरूंच्या आज्ञेचे पालन करण्याचे महत्त्व लक्षात येते.
– (प,पू.) डॉ. आठवले