आम्ही कर्मधर्माला मानत नाही. कर्म मागे, तर धर्म आमच्या पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो.
भावार्थ : ‘कर्म मागे’ म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करत नाही. ‘धर्म आमच्या पुढे असतो’ म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण. ‘आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो’ म्हणजे सतत वर्तमानकाळात असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’)