वृद्धाश्रम चालवणार्‍यांनो,वृद्धाश्रमात रहाणार्‍यांकडून साधना करवून घ्या !

बर्‍याच वृद्धाश्रमांच्या पत्रकांत आणि जाहिरातींत तेथे काय सोयी आहेत, याची माहिती असते. वृद्धांच्या करमणुकीसाठी एखाद्या कार्यक्रमाला किंवा सहलीलाही त्यांना घेऊन जातो, असेही त्यात सांगितलेले असते. वृद्धाश्रमात शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवरची काळजी घेतली जात असले, तरी आध्यात्मिक स्तरावर काळजी घेतली जात नाही. बहुतेक वृद्धांनी आयुष्यभर साधना केलेली नसते. आता त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या काळात तरी त्यांच्यावर साधनेचे संस्कार करणे अत्यावश्यक असते. त्या संस्कारांमुळे पुढील जन्मात तरी ते लहानपणापासून साधना करून मनुष्यजन्माचे कल्याण करू शकतील. याकडे वृद्धाश्रम चालवणार्‍यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे.
– (प.पू.) डॉ. आठवले (२२.७.२०१४)

हिंदु राष्ट्रात वृद्धाश्रम नसतील; कारण साधनारत मुले हल्लीच्या मुलांप्रमाणे कृतघ्न नसल्याने त्यांच्या आई-वडिलांची प्रेमाने काळजी घेतील ! – (प.पू.) डॉ. आठवले

Leave a Comment