हल्ली एकत्र कुटुंब हा शब्द भूतकाळातील आणि अशक्य असा वाटतो. पूर्वीच्या एकत्र कुटुंबात केवळ सख्खीच नाही, तर चुलत भावंडेही एकत्र रहात. काही एकत्र कुटुंबांत ४० – ५० व्यक्तीही असत. बर्याच कुटुंबांतील वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यात येत आहे. घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. काही वर्षांनी तर कुटुंब हा शब्दही उरणार नाही कि काय ?, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हा आहे व्यक्तीस्वातंत्र्य, पाश्चात्त्यांचे अनुकरण आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांचा परिणाम. हे टाळण्यासाठी साधना करून प्रीती निर्माण करून हे विश्वचि माझे घर । ही वृत्ती निर्माण करणे आवश्यक आहे.
– (प.पू.) डॉ. आठवले (२२.७.२०१४)