कर्मकांडानंतर उपासनाकांड येते. मी उपासनाकांडांतर्गत नामजपापासून साधनेला आरंभ केला. त्यामुळे मला यज्ञयागादीच नाही, तर साध्या पूजापाठाचीही ओढ नव्हती. असे असले, तरी विविध ठिकाणी होणार्या कर्मकांडांचे गेली १५ वर्षे ध्वनीचित्रीकरण करवून घेऊन मी ते संग्रही ठेवले आहे. त्याचा काय उपयोग हे मला ज्ञात नव्हते. २० ते २६ जून २०१४ मध्ये गोव्यात झालेल्या तिसर्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला नेपाळहून आलेल्या प्रतिनिधींनी सांगितले, आपल्याकडे धार्मिक विधींच्या जेवढ्या ध्वनीचित्रफिती असतील, त्या आम्हाला द्या. आम्हाला अभ्यासासाठी आणि इतरांना सांगण्यासाठी त्या उपयोगी पडतील. हे ऐकल्यावर कर्मकांडांचे ध्वनीचित्रीकरण करण्यास देवाने आधीच का सुचवले, हे लक्षात आले. तिसर्या महायुद्धाच्या काळानंतर कर्मकांडांचे जाणकार कमी प्रमाणात असले, तरी हा विषय शिकवण्यासाठी हिंदू राष्ट्रात ध्वनीचित्रफितींमुळे शक्य होईल. – (प.पू.) डॉ. आठवले (१०.७.२०१४)