बर्याच मंदिरांत आणि इतरत्र कीर्तनकारांची कीर्तने होतात; मात्र त्यांचा कीर्तनाला आलेल्यांवर परिणाम झाला आणि ते साधनेला लागले, असे आढळून येत नाही. याचे कारण हे की, बहुतेक कीर्तनकार जरी स्वतःला ह.भ.प., म्हणजे हरिभक्त परायण म्हणवत असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्यापैकी किती
जण हरिभक्त परायण असतात ? भक्तीमुळे सर्वस्व सोडले, असे किती जण असतात ? फारच थोडे उलट बरेच जण कितीतरी अधिक मानधन मागतात. अशांच्या कीर्तनाला आलेल्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही, तर केवळ तात्कालिक मानसिक लाभ होतो. – प.पू. डॉ. आठवले