हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ संतांचा संकल्प आणि अस्तित्व यांमुळे होणार असणे !

आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यरत हिंदुत्ववादी कार्यकर्ते अन् नेते यांचे कार्य आणि संत करत असलेले कार्य यांत जमीन-आकाशाइतका पुढीलप्रमाणे भेद आहे. येथे लक्षात घेतले पाहिजे की, संतांमध्येही प्रकार आहेत. येथे उल्लेख केलेले संत उच्च स्तराचे आहेत.



१. कार्यकर्ते : हे मन आणि स्थूल देह यांच्या स्तरांवर कार्य करतात.



२. नेते : हे बुद्धीच्या स्तरावर कार्य करतात.



३. संत : संत म्हणजे ईश्‍वराचे सगुण रूप. ईश्‍वराप्रमाणेच त्यांचे कार्य सूक्ष्मातून चालू असते, म्हणजे ते बुद्धीअगम्य असते. त्यांच्या कार्याचे दोन स्तर आहेत.



अ. संकल्प : ईश्‍वराच्या केवळ संकल्पाने अनंत कोटी ब्रह्मांडांची निर्मिती झाली. त्याप्रमाणे काही संतांनीही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांनी नुसता आशीर्वाद दिला आहे, असे नसून त्यासाठी ते अखंड अनुष्ठानही करत आहेत. पूर्वी ऋषी यज्ञ करायचे, त्याप्रमाणे संतांचे अनुष्ठान आहे.



आ. अस्तित्व : ईश्‍वराच्या केवळ अस्तित्वाने अनंत कोटी ब्रह्मांडांचे कार्य चालते. सूर्याच्या केवळ अस्तित्वाने प्रतिदिन पहाटे मनुष्यासह पशू-पक्षी कार्यरत होतात, तसेच संतांच्या केवळ अस्तित्वाने हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे.

  थोडक्यात म्हणजे संतांच्या केवळ संकल्पाने आणि अस्तित्वाने हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. आपण जे करतो, ती आपली केवळ साधना आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आपल्या प्रयत्नांचे महत्त्व फक्त ३० टक्के आहे. तर संतांमुळे ७० टक्के कार्य होणार आहे. या दोन कार्यांतील भेद एवढाच की, आपले कार्य सर्वांना कळते, तर संतांचे कार्य सूक्ष्मातील, म्हणजे पंचज्ञानेंद्रियेे, मन आणि बुद्धी यांच्या पलिकडील असल्यामुळे आपल्याला ते कळत नाही. अशा संतांपैकी १० संत आम्हाला ज्ञात आहेत. इतरही अनेक संत कार्यरत आहेत.




– डॉ. आठवले (१७.६.२०१४)

Leave a Comment