आनंद हा कोणताही प्रसंग, वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी निगडीत नसावा. ज्या गोष्टीमुळे दुःख होते वा होईल, असा कोणताही आनंद नसावा. आपला आनंद आपल्यात मिळावा, हा विचार प्रत्येकाने सांभाळून ठेवावा, म्हणजे कोणत्याही अवस्थेत शांती ढळणार नाही. तुझे आहे तुजपाशी या संतवाणीप्रमाणे ज्याचा त्याने शोध घेत जावा. मनाची स्थिती केवळ स्वतःशीच निगडीत असावी. अन्य कुठेही संपर्क नसावा. हे प्रगत होऊ पहाणार्या साधकांना परत परत सांगू इच्छितो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन