जिथे आपल्या देहावरच आपला ताबा नसतो, तेथे आपल्या वस्तू, वास्तू इत्यादींना आपले म्हणायचा आपल्याला काय अधिकार ? आपण ज्या वास्तूत रहातो, ती वास्तू आपल्याला आपली वाटते; पण ती वास्तू आपली नसून वास्तूदेवतेची असते; कारण त्या जागी आपण पुढे असू किंवा नसू, तरी देवता मात्र तेथेच असते.
राजकारण्यांनाही वाटते, हा मतदारसंघ माझा. हे गाव माझे. हे शहर माझे; पण ते त्यांचे नसून स्थानदेवता, ग्रामदेवता यांचे आहे, हे त्यांना कळत नाही.
– (प.पू) डॉ. आठवले (९.१२.२०१४)