हिमालयात एकांतात राहून आयुष्यभर साधना केली, तरी साधकातील स्वभावदोष आणि अहंभाव नष्ट झाले, याची खात्री देता येत नाही. असा साधक जेव्हा समाजात येतो, तेव्हा अनेक वर्षे प्रसंगच न घडल्याने निद्रिस्त असलेले त्याचे दोष बहुदा उफाळून येतात. याचाच अर्थ हा की, एकांतातील व्यष्टी साधनेत दोष लक्षात येत नाहीत.
याउलट समष्टी साधनेत इतरांशी वारंवार संबंध येत असल्यामुळे स्वतःतील दोष लक्षात यायला साहाय्य होते. त्यामुळे जलद आध्यात्मिक प्रगती होते. – (प.पू.) डॉ. आठवले (२६.१०.२०१४)