हल्ली भोंदू महाराज, स्वामी इत्यादींचा एवढा सुळसुळाट झाला आहे की, त्यांच्यामुळे खर्या संतांपर्यंत बहुतेक व्यक्ती पोहोचू शकत नाहीत. भोंदू महाराज आणि स्वामी यांचे पितळ काही काळाने उघड होते. असा अनुभव आला की, सर्वसाधारण जनतेचा खर्या संतांवरचाही विश्वास डळमळीत होतो. त्यामुळे त्यांचा साधना, अध्यात्म आदी विषयांवरचाही विश्वास उडतो. अशा व्यक्ती बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या जाळ्यात सापडतात आणि धर्मद्वेष्ट्या होतात. हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्रात खर्या संतांनाच स्वतःला महाराज, स्वामी इत्यादी म्हणवून घेण्याचा अधिकार असेल ! – डॉ. आठवले (२०.६.२०१४)