पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला परत येण्याची इच्छा होते; म्हणून म्हणतात, ‘इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।’
भावार्थ : ‘इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।’ म्हणजे ‘पंढरपूरला जाणार’, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्वराच्या भेटीपेक्षा ‘भेट होणार’ यात जास्त आनंद आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’)