१. कला : येथे चित्रकलेचे उदारहण घेऊ. एखाद्या देवतेचे सुंदर चित्र काढले, तर चित्र काढणार्याला आणि ते पहाणार्याला थोडा वेळ आनंद मिळतो. मात्र त्या चित्रातून काहीतरी शिकले, असे होत नाही.
२. अध्यात्मविषयक लिखाण : एखाद्या देवतेवरील लिखाणामुळे वाचकाला अभ्यास करण्यास दिशा आणि स्फूर्ती मिळते.
यावरून शिकण्याच्या संदर्भात कलेपेक्षा अध्यात्मविषयक लिखाण महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल.
– डॉ. आठवले (११.६.२०१४)