त्रयस्थाच्या हृदयात कौतुक, मित्रांच्या हृदयात अभिमान व शत्रूंच्या हृदयात भय उत्पन्न करणारा तो ध्वनी आहे ! : संचलनाला साथ देणाऱ्या संघाच्या तुतारीतून निघणाऱ्या आवाजाचे वर्णन करतांना सावधान साप्ताहिकाने म्हटले होते, ‘त्रयस्थाच्या हृदयात कौतुक, मित्रांच्या हृदयात अभिमान व शत्रूंच्या हृदयात भय उत्पन्न करणारा तो ध्वनी आहे. ती आशेची हाक आहे. तो पराक्रमाला हुंकार आहे. तो विजीगिषेचा नाद आहे. उज्ज्वल भविष्यकालाच्या येत्या पावलांची ती चाहूल आहे व उज्ज्वलतर परंपरेचे ते अमोल आशीर्वचनच आहे’. – श्री. नाना पालकर (त्रैमासिक लोकजागर, गुढीपाडवा विशेषांक २००९, पृष्ठ २८)
एके दिवशी सारगाछी आश्रमाच्या विनोद कुटीमध्ये स्वामी अखंडानंद यांनी गोळवळकर गुरुजींना दीक्षा दिली. ७.२.१९३७ या दिवशी दुपारी स्वामी अखंडानंदांनी देह ठेवला.
– श्री. नाना पालकर (त्रैमासिक लोकजागर, गुढीपाडवा विशेषांक २००९, पृष्ठ २३)