पातळीनुसार भक्तीमार्गातील साधनेचे पुढचे पुढचे टप्पे

हल्ली बहुसंख्य व्यक्ती साधना करत नाहीत. साधना करणार्‍या बहुतेकांना साधनेत पातळीनुसार पालट होत जातो, हे ज्ञात नसते. त्यामुळे ते आयुष्यभर तीच साधना करत रहातात. कोणत्याही योगमार्गाने साधना करत असले, तरी असेच होत असल्याचे लक्षात येते. येथे भक्तीयोगाचे उदाहरण दिले आहे.

भक्तीयोगातील प्रगतीनुसार साधनेतील टप्पे :

साधनेचा
प्रकार आणि स्तर
अनुभव
आणि अनुभूती
साधकाची
आध्यात्मिक पातळी (टक्के)
(टीप १)
साधनेत
या टप्प्याला येण्यामागील तत्त्व
१.
पूजापाठ
(सर्वसाधारण
व्यक्ती)
१५
– २० मिनिटांत पूजा आटोपणे आणि नंतर दिवसभर देवाला विसरणे
२० कुटुंबाचे
संस्कार
२.
भावपूर्ण पूजापाठ (साधक)
दिवसभर
अधूनमधून देवाची आठवण होणे
३० भावाचे
महत्त्व समजणे
३.
मानसपूजा
दिवसभर
देवाची अधिक वेळा आठवण होणे
४० स्थुलापेक्षा
सूक्ष्म श्रेष्ठ हे कळणे
४.
नामस्मरण
नामाशी
अधिकाधिक एकरूप होणे
५० अनेकातून
एकात जाणे महत्त्वाचे हे कळल्याने मानसपूजेतील अनेक घटकांपासून (उदा.
स्नान, गंध, अक्षता, फूल इत्यादींपासून) एका नामावर येणे
५.
भावपूर्ण नामस्मरण
आनंद ७० शब्दांपलिकडे
असलेल्या भगवंताशी एकरूप होण्यास आरंभ होणे
६.
नामाशी एकरूप होणे (मुक्ती / मोक्ष)
शांती १०० भगवंताशी
एकरूप होणे (अद्वैत)

टीप १ – सर्वसाधारण व्यक्तीची पातळी २० टक्के आणि मोक्ष म्हणजे १०० टक्के, यासंदर्भात त्या त्या स्तराची आध्यात्मिक पातळी दिली आहे.

– (प.पू.) डॉ. आठवले (२९.६.२०१४)

Leave a Comment