आज धर्मरक्षणाकरता स्त्रियांनी सर्वस्व त्यागण्याचा विलक्षण दुर्धर प्रसंग ओढवला आहे !

धर्माकरता केलेला सर्व त्यागच ‘इह’ आणि ‘पर’ जीवन कृतार्थ करतो. स्त्रीची तृप्ती मातृत्वात असली, तरी त्याहीपेक्षा श्रेष्ठतम, परमतृप्ती देणारा स्व-धर्माकरता मातृत्वाचाही त्याग करण्यात, प्रसंगी सर्वस्वाचा होम करण्यात आहे. हे सतीचे वाण आहे. किंबहुना त्याहीपेक्षा दिव्यदाहक आहे. सतीला किमान सरणावरच्या पतीशवाचा तरी आधार असतो. इथे तोही नाही. धर्म ही चीजच मुळी अमूर्त, अदृष्ट आहे. आज धर्मरक्षणाकरता स्त्रियांनी सर्वस्व होमून टाकण्याचा विलक्षण दुर्धर प्रसंग ओढवला आहे.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २०१०)

Leave a Comment