एका भक्ताला गुरूंचे दर्शन झाले नाही. दुसरा भक्त गुरूंना भेटला, तेव्हा गुरूंनी त्याच्या पुत्राच्या विवाहानिमित्त त्याला पादुका दिल्या. त्याने हे पहिल्या भक्ताला सांगितल्यावर तो म्हणाला, ‘मला गुरूंच्या पादुका दे, मी तुला माझी जीवनभराची मिळकत देतो.’ दुसऱ्या भक्ताने त्याला पादुका दिल्या. पहिल्या भक्ताने पादुका हृदयाला लावल्या आणि तो नाचू लागला. गुरूंना हे समजल्यावर त्यांनी पहिल्या भक्ताला विचारले, ‘पादुका किती मूल्य देऊन घेतल्या ?’ भक्त म्हणाला, ‘जीवनभराची मिळकत दिली.’ त्यावर गुरु म्हणाले, ‘व्यवहार (सौदा) स्वस्तात झाला. गुरुपादुका, गुरुकृपा यासाठी प्राण द्यावे लागतात.’
– डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)