काही जणांना प्रश्न पडतो, आम्हाला गुरुमंत्र मिळालेला असतांना आम्ही कालमहात्म्यानुसारचा श्रीकृष्णाचा जप करायचा का ? याचे उत्तर आहे, गुरुमंत्र व्यष्टी साधनेसाठी आहे, तर समष्टी साधनेसाठी कालमहात्म्यानुसार श्रीकृष्णाचा जप वर्ष २०२३ पर्यंत आवश्यक आहे. वर्ष २०२४ पासून श्रीरामाचा जप आवश्यक असेल. गुरुमंत्र काळानुसार पालटत नाही, तर समष्टी साधनेसाठीचा जप कालमहात्म्यानुसार पालटतो. – (प.पू) डॉ. आठवले (२४.११.२०१४)