विद्यारण्य स्वामी फारच गरीब होते. अर्थप्राप्तीसाठी त्यांनी गायत्रीची २४ पुरश्चरणे केली; पण अर्थप्राप्ती झाली नाही. तेव्हा त्यांनी थकून संन्यास घेतला. त्या वेळी गायत्री मातेचे दर्शन झाले. देवी म्हणाली, ‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग.’ स्वामी म्हणाले, ‘आता मला काही मागायची इच्छा नाही. इच्छा होती, तेव्हा तू मला प्रसन्न झाली नाहीस. असे का झाले ? आता मला काही नको आहे आणि तू वर द्यायला आली आहेस !’ देवी म्हणाली, ‘कित्येक पूर्वजन्मांची पापे तुझ्या तपश्चर्येने जळून गेली. मागे वळून पहा. जे २४ पर्वत जळत आहेत, ती तुझी पापे होती. ती जळून नष्ट झाली. तुझ्या पापांचा क्षय झाल्यावर लगेचच मी आले.’