वृद्ध आई-वडिलांची, आजोबा-आजींची काळजी न घेता, ते गेल्यावर श्राद्ध, त्रिपिंडी श्राद्ध करणार्यांना विधींचा कितपत लाभ होणार ? पूर्वजांचा त्रास होतो; म्हणून नारायण-नागबळी सारखे विधी करणे केवळ स्वार्थी होेत. वडिलधार्यांची सेवा करणे, हाच पितृऋणातून मुक्त व्हायचा खरा मार्ग आहे. वडिलधार्यांची सेवा करणे हे कर्तव्यच आहे. त्याचे पालन केले, तर पुण्य लाभत नाही, पण न केल्यास दोष लागतो. विवाहाचा उद्देश देव आणि पितर यांच्या ऋणातून मुक्त होणे, हा आहे. पुत्रजन्मानंतर त्याचे मुख पाहिल्यावर पिता पितृऋणातून मुक्त होतो, असे शास्त्र आहे. धर्मशास्त्रानुसार आचरण करत वडिलधार्यांची सेवा करणे, हाच पितृऋणातून मुक्त होण्याचा खरा मार्ग आहे ! – (प.पू,) डॉ. आठवले (१३.५.२०१४)
संतांचे श्राद्ध करावे लागत नाही; कारण देहत्यागानंतर ते भुवर्लोकात किंवा स्वर्गलोकात अडकत नाहीत, तर त्यांच्या स्तराप्रमाणे जन, तप किंवा सत्य लोकात जातात. – (प.पू,) डॉ. आठवले (१६.१२.२०१४)