सन १८९८ साली चाफेकर प्रकरणामुळे झालेली शिक्षा भोगून लोकमान्य तुरुंगातून ज्या वेळी सुटून बाहेर आले, त्या वेळी ते कसब्याच्या श्रीगणपतीस प्रथम आणि नंतर श्री. अण्णासाहेब यांच्या दर्शनास गेलेे. अगोदर घरी जाऊन आला का ? असा श्री. अण्णासाहेबांनी जो प्रश्न विचारला त्यावर लोकमान्य एकदम उद्गारले, प्रथम श्री गणपति नंतर तुम्ही ! गीतारहस्य छापल्यानंतर पहिली प्रत पंढरपूरच्या श्रीविठ्ठलास षोडशोपचारपूर्वक वाहण्यात आली. दुसरी कसबापेठेच्या श्री गणपतीस समर्पण करण्यात आली आणि तिसरी स्वतः श्री. अण्णासाहेबांस त्यांनी अर्पण केली.
– डॉ. ब.स. येरकुंटवार (प्रज्ञालोक, ऑक्टोबर २००६)
यावरून श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र लिहिणारे लो. टिळक कर्मयोगी आणि भक्तीयोगीही होते, हे सिद्ध होते. – (प.पू.)डॉ. आठवले (१०.१०.२०१३)