१९४२ या वर्षी देशाची स्थिती पहावली नाही; म्हणून साधना करणारे एकजण क्रांतीकारक बनले. ते पकडले गेल्यावर पोलिसांनी सहकाऱ्यांची नावे विचारली. तेव्हा अध्यात्माचा अर्धवट अभ्यास झाल्याने, म्हणजे ‘सत्यं ब्रूयात् (सत्य बोलावे)’ एवढेच माहित असल्याने त्यांनी सत्य सांगितले, म्हणजे त्यांच्या बरोबरच्या इतर क्रांतीकारकांची नावे सांगितली. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्या सहकाऱ्यांनाही फासावर लटकवले. त्यांनी अध्यात्माचा पूर्ण अभ्यास केला असता, तर त्यांना ‘सत्यं ब्रूयात्’ यापुढील’ प्रियं ब्रूयात् । न ब्रूयात् सत्यम् अप्रियम् ।’, म्हणजे इतरांना आवडेल असे बोलावे; पण अप्रिय, हानीकारक असे सत्य बोलू नये, हे शब्द कळले असते आणि त्याचे पालन केले असते अन् इतर क्रांतीकारकांची फाशी टळली असती.
– (प.पू.) डॉ. आठवले, २३.४.२०१३