साधनेत तन, मन आणि धन यांचा त्याग करणे अपेक्षित असले, तरी ते क्षमतेप्रमाणे अपेक्षित असते. एखादा आजारी असल्यास त्याने तनाने, म्हणजे शरिराने सेवा करणे अपेक्षित नसते. एखाद्याकडे धन नसल्यास त्याने धनाचा त्याग करणे अपेक्षित नसते. मनाचा त्याग करणेही मनोरुग्णाला शक्य नसते. यामुळे तन, मन आणि धन यांपैकी ज्याचा जेवढा त्याग करणे शक्य असेल, तेवढे करत गेले की, साधना होते. – डॉ. आठवले