काही जण समाजसेवा करतात. आत्मकेंद्रित, स्वार्थी व्यक्तींपेक्षा समाजसेवा करणारे निश्चितच उच्च स्तराचे होत; कारण ते स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत नाहीत. असे असले, तरी साधकांनी समाजसेवेत अडकू नये; कारण समाजसेवा करणे हेही सात्त्विक मायेत येते. साधकांना याच्याही, म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे जायचे असल्याने त्यांनी समाजासाठी काही करावे, असे वाटत असले, तर समाजाला साधना शिकवावी. त्याच्याकडून साधना करवून घ्यावी. – डॉ. आठवले (११.५.२०१४)