स्वार्थाकरता ब्रिटिशांनी मेकॉलेची सदोष शिक्षणपद्धती रूजवली नव्हे, तर ब्रिटिशांची न्यायदान पद्धतीही रुजवली, जिच्यापासून न्याय मिळणे शक्य नव्हते. दुर्दैवाने स्वातंत्र्याची सहा दशके उलटून गेली, तरी तीच न्यायसंस्था आजही भारतात अस्तित्वात आहे. आम्ही न्यायाची अपेक्षा कशी करावी ? याचा विचार आमचा उत्तम (elite) वर्ग का करीत नाही ? गेल्या २५-३० वर्षात भारतात कोणती चांगली घटना घडली आहे ? गेल्या २०-२५ वर्षांची वृत्तपत्रे चाळा, नियतकालिके पाहिल्यास ९९ टक्के देश भ्रष्ट असल्याच्या अगणित साक्षी आहेत. पूर्वीपासून अत्यंत महान असलेल्या या देशात कोणती चांगली घटना वा प्रसंग गेल्या २५-३० वर्षात घडला आहे ? दिवसेंदिवस बेईमानीचे, भ्रष्टाचाराचे प्रमाण संपूर्ण भारतभर वाढतच आहे.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित ऑक्टोबर २०१०)