पाकिस्तान आक्रमण करणार, या भीतीने भारतीय शासन जो अपरंपार पैसा, शक्ती आणि प्रज्ञा संरक्षणावर वेचते आहे, त्यामुळे विधायक योजना खोळंबून पडल्या आहेत, पुष्कळशी कामे स्थगित करावी लागली आणि त्यामुळे जनतेत नैराश्य पसरले आहे. केवळ पाकिस्तानच्या आक्रमणाच्या भयाने थरथरणारे आपले शासन. प्रचंड संपत्ती संरक्षणावर बरसते आहे. हे सगळे भारतीय प्रजेला एक वेळ उपाशी ठेवूनच करावे लागते आहे. तेच त्याचे मूल्य आहे. आमच्या शहाण्या शासनकर्त्यांना भारतीय राजनीतीचे अनुसरण करण्याची बुद्धी कधी येईल ? (घनगर्जित, ऑक्टोबर २०१०)