१. देऊळ आणि तीर्थक्षेत्र
अशा चैतन्यमय जागी चपला वापरल्या, तर पावलांतून चैतन्य ग्रहण होत नाही.
२. व्यासपीठ
व्यासपिठाला व्यासपीठ म्हणतात; कारण त्यावर खरा अधिकार महर्षी व्यासांचाच आहे. ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।’ म्हणजे या जगातील अध्यात्मविषयक सर्व ज्ञान हे महर्षि व्यासांचे उच्छिष्ट (उष्टे) आहे, अशी लोकोक्ती रूढ झाली आहे. आपण तेथे जातो, तेव्हा त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून चपला घालायच्या नसतात.
हल्लीचे पाश्चात्त्यांचे सर्वच बाबतींत अनुकरण करणारे बुद्धीप्रामाण्यवादी (खरे म्हटले, तर अज्ञानवादी) पाश्चात्त्य चर्चमध्ये बूट घालून जातात, हे उदाहरण देतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, पाश्चात्त्यांना ‘चैतन्य’ हा शब्दही माहीत नसतो.
– (प.पू.) डॉ. आठवले (६.५.२०१३)