चोरांनी चंद्राचा, मत्सरी लोकांनी महाकाव्याचा, तर कुलटा स्त्रियांनी पतिव्रतेचा द्वेष करणे

चन्द्रिकां तस्करो द्वेष्टि कवितां मत्सरी जनः ।

कुलटा च स्त्रियं साध्वीं स्वभावो दुरतिक्रमः ॥

अर्थ : चोर चंद्राच्या चांदण्याचा द्वेष करतो. मत्सरी मनुष्य कवितेचा द्वेष करतो. व्यभिचारिणी स्त्री पतिव्रतेचा राग करते. स्वभाव खरोखरच ओलांडून जाण्याजोगा (बलण्याजोगा) नसतो !

स्पष्टीकरण : चोराला काळाकुट्ट अंधार प्रिय असतो. शुभ्रधवल चंद्राकाशाचा तो द्वेष करतो. कुलटा, जारिणी स्त्री महासाध्वी पतिव्रतेचा द्वेष करते. मत्सरग्रस्त जन रामायण, महाभारतादी श्रेष्ठ ग्रंथ आणि व्यास, वाल्मीकि यांचा द्वेष करतात. व्यभिचारी आणि स्वैराचारी असणारे लोक ब्रह्मचर्याची निंदा, हेटाळणी आणि कुचेष्टा करतात.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मार्च २००६)

Leave a Comment