आज औद्योगिक संस्कृतीने भयंकर धुमाकूळ घातला आहे. यंत्रांची इतकी बेसुमार वाढ झालेली आहे की, ही यंत्रे बाजूला सारली नाहीत, तर तीच आपल्याला खाऊन टाकतील. Stop machines, otherwise they will stop you ! या औद्योगिक संस्कृतीने कसा धुमाकूळ घातला आहे पहा. संपूर्ण पृथ्वीच या कंपन्यांच्या मालकीची झाली आहे. कडुलिंबाचे, बासमती तांदुळाचे पेटंटच नव्हे, तर बौद्धिक स्वामित्व हक्काच्या विचित्र कायद्याने अशा बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हक्क प्रस्थापित होतील. आमच्या गायींचे गोमूत्र आम्हालाच २०० रुपये लिटरने विकत घ्यावे लागेल. आज युरोप आणि अमेरिका येथे इतकी प्रचंड संपत्ती आहे की, तीच त्यांच्या उरावर नाचू लागली आहे. आमचे सूत्र असे आहे की, धनाने धर्म आणि धर्माने धर्माकरता धन संपादायचे. मग राष्ट्राचा, प्रजेचा, नव्हे, तर पृथ्वीचा उत्कर्ष अटळ आहे. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी ( वाङ्मय पत्रिका घनगर्जित, वर्ष तिसरे, अंक ५.)