प्रल्हादाच्या भक्तीचा उगम त्याच्या जन्मापूर्वीच्या संस्कारांत असणे

१. एकदा हिरण्यकश्यपू तप करण्यासाठी वनात गेला होता. तेव्हा बृहस्पतीने पोपटाचे रूप घेऊन नारायण नारायण असे म्हणत त्याचा तपोभंग केला. हिरण्यकश्यपू रागावून घरी आला. पत्नी कयाधूने विचारले, पोपट काय म्हणत होता ? हिरण्यकश्यपू म्हणाला, नारायण नारायण. तिने पुनःपुन्हा तेच विचारले. तेव्हा हिरण्यकश्यपूचा १०८ वेळा नारायण नारायण असा जप झाला. त्या रात्री संभोग होऊन कयाधूला गर्भधारणा झाली.

२. कयाधू गर्भवती असतांना ५ व्या महिन्यात नारद मुनींच्या आश्रमात आली. तेथे गर्भावर नारायण नारायण हा संस्कार दृढ झाला.



गुरूंनी शिष्याला भगवंताची अनुभूती तात्काळ देणे

एक शिष्य गुरूंना म्हणाला, मला भगवंताचे दर्शन हवे. गुरूंनी शिष्याची कॉलर पकडली आणि ते म्हणाले, सूर्याच्या किरणांतील चमक, पक्ष्यांची गाणी, आईचे वात्सल्य यांत तुला भगवंताचे दर्शन होत नाही का ? तुला आणखी नवीन आकृती कशाला पाहिजे ? थोडा वेळ शांत बस.

थोड्या वेळाने गुरूंनी शिष्याला उठवले. तेव्हा त्यांच्यात पुढील संवाद झाला.

गुरु : काय दिसते ?

शिष्य : केवळ तुम्ही दिसता.

गुरु : भगवान दिसत नाही ?

शिष्य : तुम्ही आणि भगवान एकच आहात.

गुरु : तत् त्वमसि । तू पण भगवान आहेस.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

Leave a Comment