एका अधिवक्त्याने खुनाच्या आरोपातून सोडवण्यासाठी आपल्या अशिलाला सांगितले, ‘न्यायाधिशांनी काहीही विचारले, तरी तू बॅह ऽ बॅहऽऽ असेच म्हणायचे’. दाव्याचा निकाल देतांना न्यायाधिशांनी हा माणूस वेडा आहे, असे समजून त्याला शिक्षा केली नाही. दावा जिंकल्यावर अधिवक्त्याने त्याच्याजवळ शुल्क मागितले. तेव्हा त्यालाही त्याने बॅहऽ बॅहऽऽ, असेच उत्तर दिले !
हुशार राजा
फ्रान्समधील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात आलेला सर्वांत मोठा भोपळा ५० कि.मी. अंतर चालत जाऊन फ्रान्सचा राजा लुई याला त्याच्या राजसभेत (दरबारात) प्रेमाने भेट दिला. राजाने त्याला एक सहस्र क्रोन बक्षीस दिले. हे पाहून दुसऱ्या दिवशी राजसभेतील एका सरदाराने आपला सर्वांत उत्तम घोडा राजाला भेट दिला. राजा मनातल्या मनात समजला आणि त्याने त्या सरदाराला एक सहस्र क्रोनचा तो भोपळा बक्षीस दिला !
भगवंताचे वैशिष्ट्य
कोणतीही वस्तू एकाचीच होते; मात्र भगवंत सर्वांचा असतो. जी वस्तू सर्वांचीच होते, तीच शाश्वत सत्य आहे. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले