विज्ञानशास्त्र शक्तीशी संबंधित शास्त्र आहे, तर अध्यात्मशास्त्र हे शिवाशी संबंधित शास्त्र आहे. शक्ती शिवाच्या म्हणजे धर्माच्या (सत्याच्या) समवेत असेल, तरच कल्याणकारक होईल. शक्ती शिवाच्या समवेत गेली नाही, तर नाशक (विनाशकारी) होईल.
सर्वत्र भगवान आहे, मग मल-मूत्र विसर्जन कसे करणार ?
मनुष्याच्या शरिरात सहस्रो जीवाणू मल-मूत्र विसर्जन करतात, तरी तो अपवित्र होत नाही. परमेश्वराच्या शरिरातच सर्व विश्व असल्याने सर्वांच्या मल-मूत्राने तो तरी अपवित्र कसा होणार ?
प्रत्येकाचा दृष्टीकोन आणि भाव निराळा
राम आणि लक्ष्मण मिथिला नगरी बघायला जाणार होते. तेव्हा विश्वामित्र ऋषी त्यांना म्हणाले, ‘तुम्ही मिथिलेतील वेदान्ती लोकांना भगवंताच्या नामरूपाचे महत्त्व पटवण्यासाठी जात आहात’. ते दोघे नगरी पहात असतांना एक सून घुंघट काढून रामाला पाहू लागली. ते पाहून तिची सासू तिला ओरडली आणि म्हणाली, लाज नाही वाटत ? सून म्हणाली, ‘रामाला बघायचे सोडून मला कोण पहाणार ?’
– डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)