चेहरा हसरा ठेवायला शिका आणि स्वतःला आणि इतरांना आनंद द्या !

देवाचे गुण आपल्यात यावे; म्हणून साधक साधना करतात. देवाच्या इतर गुणांकडे त्यांचे लक्ष असते; पण त्याच्या तारक रूपात त्याचा चेहरा हसरा, आनंदी असतो, हे बर्‍याच जणांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की, मन आणि शरीर यांचे एकमेकांवर परिणाम होतात. मन गंभीर असेल, तर चेहरा गंभीर दिसतो. याउलट चेहरा हसरा ठेवायचा प्रयत्न केला, तर मनावरचा ताणही कमी होतो. त्याचबरोबर इतरांनाही गंभीर नाही, तर हसरा चेहरा पहायला आवडतो. यासाठी प्रत्येकाने चेहर्‍यावर हास्य दिसेल, याची काळजी घ्यावी, म्हणजे स्वतःबरोबर इतरांनाही आनंद वाटेल. सुरुवातीला चेहर्‍यावर प्रयत्नपूर्वक आणलेले हास्य कृत्रिम वाटेल; पण काही आठवड्यांनी ते नैसर्गिक वाटेल. याचसंदर्भात हास्य उपचार अशी एक उपचारपद्धत प्रचलित होत आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे आपण स्वतः ती विनामूल्य वापरू शकतो. – डॉ. आठवले (१६.३.२०१४)

Leave a Comment