१. व्यक्तीवरील प्रेम : शारीरिक आकर्षण हा साध्या प्रेमाचा पाया असतो. प्रेयसीविषयीचे किंवा प्रियकराविषयीचे प्रेम हे लैंगिक इच्छा किंवा लैंगिक उपजत बुद्धीपासून निर्माण होते आणि ते प्रत्येक जिवंत प्राण्यात आणि माणसात असते.
१ अ. देवावरील प्रेम : देवाविषयी प्रेम केवळ माणसात असते. जे निर्माण करावे आणि वाढवावे लागते.
२. व्यक्तीवरील प्रेम : पुरुषाचे स्त्रीविषयी आणि स्त्रीचे पुरुषाविषयी प्रेम सोपे असते; कारण तो किंवा ती एकमेकांना पहातात आणि भेटू शकतात.
२ अ. देवावरील प्रेम : ज्याने देवाला कधीही पाहिले नाही, त्याला देवाविषयी प्रेम उत्पन्न होणे कठीण असते.
३. व्यक्तीवरील प्रेम : व्यक्तीवरील प्रेम साधारणतः वाढते आणि हादरते. मग माणूस आपल्या प्रेयसीचा तिटकारा करू लागतो.
३ अ. देवाविषयी प्रेम : हे सतत वाढत रहाते.
४. व्यक्तीवरील प्रेम : साध्या प्रेमात भागीदार एकमेकांचा आदर करतात किंवा करत नाहीत.
४ अ. देवाविषयी प्रेम : भक्ताचे देवाविषयीचा आदर उत्कट असतो.
५. व्यक्तीवरील प्रेम : लैंगिक प्रेम हे मनाच्या रजोगुणापासून उत्पन्न होते.
५ अ. देवाविषयी प्रेम : देवाचे प्रेम त्रिगुणातीत आहे आणि म्हणून ते सात्त्विक गुण वाढवते.
६. व्यक्तीवरील प्रेम : यात सुख मिळवण्याचा स्वार्थी हेतू जास्त असतो.
६ अ. देवाविषयी प्रेम : तुम्ही देवावर प्रेम करता, तसे देवाने तुमच्यावर प्रेम करावे, हाच देवावर प्रेम करण्याचा हेतू असतो. गोपी म्हणत, कृष्णाच्या सुखात आमचे सुख आहे.
७. व्यक्तीवरील प्रेम : लैंगिक इच्छा माणसाला प्रकाशापासून अंधाराकडे आणि ज्ञानापासून अज्ञानाकडे नेते.
७ अ. देवाविषयी प्रेम : देवावरचे प्रेम असत्यापासून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे नेते.
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)