रोग औषधांनी बरे होऊ शकतात. वातावरण पालटण्याने मानसिक रोगांची तीव्रता अल्प होते. मंत्रांनी किंवा देवतांची पूजा केल्याने पिशाचांचे निवारण होऊ शकते; परंतु हे उपचार निश्चितपणे रोग किंवा दुःख निवारण करतीलच, अशी खात्री नसते. काही रोग असाध्य असतात. प्रारब्धामुळे होणारे रोग किंवा दुःखे उपाय करूनही नाहीसे करता येत नाहीत.
सुखस्यानन्तरं दुःखं दुःखस्यानन्तर सुखम् । – महाभारत, पर्व ३, अध्याय २६०, श्लो्क ४९
अर्थ : जीवन ही सुख-दुःखांची मालिका आहे. एका दुःखानंतर काही कालानंतर परत दुसरे दुःख येतच रहाते.
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)