प्रेम

अ. पालकांचे मुलाविषयीचे प्रेम सात्त्विक असते. त्यांच्यात स्वार्थ नसतो. मुलाची उत्पत्ती, स्वभाव, कर्तव्ये, धैर्य, बुद्धी, स्मरण, जाणीव इत्यादी चांगले राखणे हे माता-पिता यांना देवाचे वरदान आहे.

आ. संत, साधू किंवा देव यांच्या कृपेनेच केवळ माणसाचे देवाविषयीचे प्रेम वृद्धींगत होते.

इ. ज्या प्रमाणात लैंगिक इच्छा न्यून होतात, त्या प्रमाणात देवावरचे प्रेम भरपूर होते. जेव्हा लैंगिक इच्छा पूर्ण नष्ट होते, तेव्हाच केवळ देव कळणे शक्य होते.

सुख आणि दुःख यांपासून होणारा लाभ

१. सुख मिळवण्यासाठी आणि दुःख टाळण्यासाठी आपल्या सर्व हालचाली चालू असतात ! :
बाह्य परिस्थितीचे ज्ञान मिळवण्यासाठी आणि जिवंत रहाण्यासाठीही सुख आणि दुःख यांची जाणीव महत्त्वाची असते. जंतूजवळ आम्लाचा थेंब ठेवला, तर तो त्यापासून दूर जातो. जंतूजवळ अन्नाचा कण ठेवल्यास तो सुख देणाऱ्या अन्नाच्या कणाकडे जातो. लहान मूलसुद्धा विस्तवापासून दूर पळते आणि जर त्याच्या पायाला काटा टोचला, तर ते पाय मागे घेते. नवीन जन्मलेले लहान मूलसुद्धा आईच्या स्तनाच्या बोंडीकडे आपले डोके हलवते आणि स्तन चोखण्यास प्रारंभ करते. याचे कारण दुधाचा स्वाद आणि चव. सुख मिळवण्यासाठी आणि दुःख टाळण्यासाठी आपल्या सर्व हालचाली चालू असतात.

२. सुख आणि दुःख ही देवाने व्यक्तीला सुधारण्यासाठी दिलेले अनुक्रमे बक्षीस आणि शिक्षा आहेत ! :
सुख आणि दुःख यांचे अनुभव आपल्याला पुष्कळ शिकवतात. बहुतेक घटनांमध्ये सुखापेक्षा दुःखाने, श्रीमंतीपेक्षा गरिबीने आणि स्तुतीपेक्षा निंदेने आपण अधिक शिकतो. सुख आणि दुःख ही देवाने व्यक्तीला सुधारण्यासाठी दिलेले अनुक्रमे बक्षीस आणि शिक्षा आहेत.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

Leave a Comment