देव, मानव आणि राक्षस यांना भगवंताने सांगितलेली साधना

एकदा देव, मानव आणि राक्षस भगवंताकडे गेले आणि त्यांनी विचारले, ‘आम्ही कोणती साधना करावी की, ज्यामुळे आमचे कल्याण होईल ?’ भगवंताने सर्वांना ‘द’ हा मंत्र दिला. त्याचा अर्थ त्यांना कळेना. तेव्हा भगवान म्हणाला, ‘देवांनी ‘द’ म्हणजे ‘दमन’ म्हणजे इंद्रियनिग्रह करावा; कारण ते सतत उच्च लोकांतील सुखोपभोगात रममाण असतात. मानवांनी ‘द’ म्हणजे ‘दान’ करावे; कारण मानव लोभी असतात आणि संग्रह करतात. राक्षसांनी ‘द’ म्हणजे ‘दया’ करावी; कारण राक्षस क्रूर असतात आणि लोकांना त्रास देतात.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९८०)

Leave a Comment