लक्ष्मी अणि सरस्वती एकत्र नांदू शकत नाहीत, असे का म्हटले जाते ?

लक्ष्मी ही संपत्ती आणि ऐश्वर्य यांची देवता आहे, तर सरस्वती ही विद्येची देवता आहे. आत्मज्ञान येण्यासाठी भौतिक सुखाचे वैराग्य येणे आवश्यक आहे. व्यक्तीकडे जेवढी जास्त संपत्ती आणि भौतिक सुखे असतील, तेवढी त्याला आसक्ती जास्त असते. जेवढी आसक्ती जास्त तेवढी आत्मज्ञान मिळण्याची शक्यता अल्प असते. येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, ‘सुईच्या छिद्रातून उंट जाऊ शकेल; पण धनाढ्य व्यक्ती स्वर्गात पोहोचू शकणार नाही’.

पूर्ण वैराग्य असलेल्या जनक राजाकडे आणि परमेश्वराकडे लक्ष्मी अन् सरस्वती या दोन्हींचाही वास असणे

राजा जनक याच्याकडे लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्हींचाही वास होता; कारण त्याला पूर्ण वैराग्य होते, तसेच सर्वशक्तीमान अन् सर्वसामर्थ्यवान अशा परमेश्वराकडे लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हीही असतात.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९१)

Leave a Comment